About Me

Mahesh Mahajan

MAHESH MAHAJAN ,

CRAFT INSTRUCTOR FOR TURNER

  नमस्कार मित्रानो , 

     मी  एम.एस.  महाजन,

आय टी आय मध्ये शिल्प निदेशक (टर्नर) या पदावर कार्यरत आहे. तंत्रज्ञाना चा वापर करून आपला प्रशिक्षणार्थी सर्वच बाबतीत अपडेट राहण्यासाठी या वेबसाईट च्या माधमातून मी छोटासा प्रयत्न करत आहे. आज संपूर्ण विश्व हे तंत्रज्ञानाबाबत जागरूक आहे, मग आपणही यामध्ये पाठीमागे राहून चालणार नाही. यासाठी वेबसाईट,एप, digital लायब्ररी , संस्था स्तरावरील उपलब्ध शैक्षणिक संसाधन याचा वापर करून प्रत्येक प्रशिक्षणार्थी  आपल्या क्षेत्रात पारंगत होणे आवश्यक आहे.   

आपण सर्व जण जाणतो कि  भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने होत आहे. या वाटचालीत SKILLED  TECHNICIAN व त्यांना तयार करणारे ओदोगिक प्रशिक्षण संस्थेचे खूप मोठे योगदान आहे. make in india व स्किल डेवलप मेंट च्या माध्यमातून भारत सरकारचे सुद्धा आपल्या क्षेत्राकडे विशेष लक्ष आहे. अश्या वेळेस एक SKILLED  TECHNICIAN सध्याच्या युगात सध्याच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपडेट राहिला पाहिजे व जागतिक स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे. 

तसेच निदेशकांना व या क्षेत्राशी आस्था ठेवणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला या क्षेत्रातील बदल,माहिती, नवीन तंत्रज्ञान , शोध या विषयीचे , माहितीचे एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे मनात होते व या वेबसाईट च्या माध्यमातून अश्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देताना मला या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे. भविष्यात याही पुढे जाऊन प्रत्येक ट्रेड चे ANDROID app ,IOS app च्या माध्यामातून आपण सर्वांच्या माहितीमध्ये भर घालण्याचा माझा स्मार्ट प्रयन्त असेल.  सध्या हि वेबसाईट डीजायानिंग व संकलन मोड मध्ये आहे, त्यामुळे आपल्या सूचनांचे सहर्ष स्वागत. 

                                                                             धन्यवाद .

                                                             MOB . NO . 9421989575            


error: Content is protected !!